

मुंबई : विनातिकीट प्रवास करून रेल्वेला फसवणाऱ्यांना मध्य रेल्वेने चांगलाच चाप लावला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या केवळ पाच महिन्यांत तब्बल १७ लाख १९ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून तब्बल १०० कोटी ५० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला असून, हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा मानला जात आहे.