
मुंबई : लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंब्रा येथे ९ जून रोजी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, केवळ ५० दिवसांत कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलसाठी ‘स्वयंचलित दरवाज्यांचा’ पहिला प्रोटोटाइप कोच तयार करण्यात आला आहे.