

Railway Employees Protest
ESakal
मुंबई : मुंब्रा अपघातप्रकरणी दोन अभियंत्यांवर दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सीएसएमटी स्थानकात केलेले आंदोलन प्रशासनासाठी डोकेदुखी ठरले. या आंदोलनामुळे तब्बल एक तास लोकल वाहतूक ठप्प झाली, लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आणि दोन प्रवाशांचा जीव गेला. या घटनेनंतर मध्य रेल्वेने संपूर्ण अहवाल मागवला असून, दोषी आढळल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.