

Central Railway Megablock
ESakal
मुंबई : १५ डब्यांच्या लोकल गाड्या सामावून घेण्यासाठी ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून शनिवारी (ता. २१) मध्यरात्री १२ पासून रविवारी (ता. २२) सकाळी १० वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द राहणार असून, काही लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत.