Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द, आठवड्यातून तीन दिवस विशेष ब्लॉक

Khopoli Train Cancelled: मध्य रेल्वेवर दोन महिन्यांसाठी विशेष ट्राफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे.
Mumbai Local

Central Railway 2 Months Block

Esakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या पळसदरी ते खोपोली स्थानकांदरम्यान ट्रॅक स्पीड रिस्ट्रिक्शन (टीएसआर) संबंधित कामासाठी १७ जूनच्या मध्यरात्रीपासून पुढील दोन महिन्यांसाठी विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० या वेळेत तीन तासांचा ब्लॉक राहणार असून, या कालावधीत पळसदरी-खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com