
मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. सकाळी ११.३० वाजता कुर्ला-सायन दरम्यान जलद मार्गावरील रुळ पाण्याखाली गेल्याने सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकल सेवा बंद करण्यात आली. हा खंड तब्बल आठ तासांपर्यंत कायम राहिला. संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी सीएसएमटीवरून कल्याणकडे लोकल सुटली आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.