

Central Railway Mumbai Local Delay
ESakal
मुंबई : कार्यालयात पोहोचण्याची वेळ निश्चित असली, तरी मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक मात्र अनिश्चित झाले आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल उशिराने धावणे, फेऱ्या रद्द होणे आणि दोन गाड्यांमधील अंतर वाढल्याने ठाणे, कल्याण आणि पुढील स्थानकांमधून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकलच्या विलंबामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून, त्याचा परिणाम नोकरदारांच्या कार्यालयीन वेळेवर होत आहे.