Mumbai Local
sakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड व्हायरवर कापड अडकल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी मुलुंड ते ठाणे दरम्यान लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने धावत असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांसह प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.