

mumbai local
esakal
मुंबई : ठाणे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी काही मिनिटांच्या अंतराने घडलेल्या दोन घटनांमुळे मध्य रेल्वेच्या जलद लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. डाऊन जलद मार्गावर एका व्यक्तीने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली, तर त्यानंतर अप जलद मार्गावर एक प्रवासी लोकलखाली पडून जखमी झाला. सकाळच्या गर्दीच्या वेळेत दोन्ही मार्गावरील लोकल काही काळ खोळंबल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला.