Central Railway : मुंबई-पुणे, मुंबई-चेन्नई गाड्या पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Central Railway : मुंबई-पुणे, मुंबई-चेन्नई गाड्या पूर्ववत

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे इंटरसिटी दैनंदिन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एग्मोर अतिजलद त्रि-साप्ताहिक सेवा एक डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक 12127 इंटरसिटी एक्सप्रेस एक डिसेंबरपासून सीएसएमटीहून दररोज सकाळी 6.40 वाजता पुण्यासाठी सुटेल. ही गाडी पुणे येथे त्याच दिवशी सकाळी 9.57 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 12128 इंटरसिटी एक्सप्रेस एक डिसेंबरपासून पुणे येथून दररोज सायंकाळी 5.55 वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री 9.05 वाजता सीएसएमटी येथे पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजी नगर (फक्त 12127 साठी) थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला दोन वातानुकूलित चेअर कार आणि 12 द्वितीय आसन श्रेणी असणार आहे.

हेही वाचा: 'MIM'चे खासदार ओवेसींची बिगर नंबरप्लेटची गाडी! दोनशे रुपयांचा दंड

गाडी क्रमांक 22157 अतिजलद एक डिसेंबरपासून सीएसएमटी येथून दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी रात्री 11.55 वाजता सुटेल. चेन्नई एग्मोर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 22158 अतिजलद 4 डिसेंबरपासून चेन्नई एग्मोर येथून दर गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी सकाळी 6.20 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 वाजता पोहचेल.

loading image
go to top