

Non AC Closed Door Mumbai Local
ESakal
मुंबई : मुंबईच्या गर्दीच्या लोकलमध्ये दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना अधिक सुरक्षित पर्याय मिळण्याची आशा पुन्हा लांबणीवर पडली आहे. स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी क्लोज्ड-डोअर लोकलच्या सुरक्षा चाचणीतच तांत्रिक आणि यांत्रिक अडचणी आढळल्याने प्रवाशांना या लोकलसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.