Mumbai Local: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा! गाड्या दीड तास उशिरा, प्रवाशी रुळांवर; Video

Central Railway: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
Central Railway Service Halted

Central Railway Service Halted

ESakal

Updated on: 

मुंबई : सकाळच्या सुमारास मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायरवर कपडा अडकल्यामुळे मुलुंड-ठाणे दरम्यान लोकलला फटका बसला होता. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत असताना आता पुन्हा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झझाल्याचे समोर आले आहे. ज्याचा परिणाम 'अप' आणि 'डाउन' अशा दोन्ही मार्गांवरील जलद (फास्ट) आणि धिम्या (स्लो) लोकल गाड्यांवर झाला. लोकल गाड्या दीड तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com