Kasara Megablock: कसारा मार्गावर दोन दिवस विशेष ब्लॉक, मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विलंब; लोकलवरही परिणाम

Central Railway: कसारा रेल्वे मार्गावर दोन दिवस विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना विलंब होणार असून लोकल सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Kasara Megablock

Kasara Megablock

ESakal

Updated on: 

मुंबई : आसनगाव कसारा तिसऱ्या मार्गिकचे काम आणि कसारा स्थानकातील अप यार्ड मार्गिकच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने १३ आणि १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. रात्री ११.१० ते मध्यरात्री १.४० या वेळेत खर्डी-कसारादरम्यान अप मुख्य मार्ग आणि तिसऱ्या मार्गिकवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही रात्री ब्लॉकच्या कालावधीत खर्डी-कसारा यादरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून, काही लोकल फेऱ्या आसनगाव आणि खर्डीपर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...