

mumbai local
esakal
मुंबई : मध्य रेल्वेकडून कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसरी व चौथ्या मार्गिकेवरील ओव्हरहेड वायरचे (ओएचई) काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याण ते बदलापूरदरम्यान उपनगरी लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार आहे.