

Central Railway 15 Days Megablock
ESakal
मुंबई : टिटवाळा स्थानकातील फलाटाचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वे २८ ऑगस्टपासून १५ दिवस विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे टिटवाळा-कसारा मार्गावरील रात्रीच्या लोकल सेवांवर परिणाम होणार असून अनेक फेऱ्या रद्द केल्या जातील. काही गाड्या ठाणे किंवा कल्याणपर्यंतच धावतील, तर काही सेवा आसनगावपर्यंत चालविण्यात येणार आहेत.