मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आणखी 18 सरकते जिने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

मुंबई - मध्य रेल्वे नवीन वर्षात काही स्थानकांवर टप्प्याटप्प्याने 18 सरकते जिने बसवणार आहे. नव्या वर्षात स्थानकांमधील सरकत्या जिन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या दादर, विद्याविहार, विक्रोळी, मुलुंड व ठाणे स्थानकांवर सरकते जिने आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल काही प्रमाणात कमी होत आहेत. रेल्वेच्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक सरकत्या जिन्यांचा वापर सरासरी 20 हजार प्रवासी करतात. दादर, घाटकोपर, कल्याण, ठाणे व टिटवाळा आदी स्थानकांवर सरकते जिने बसवण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरकते जिने बसवण्यासाठी कोणती स्थानके योग्य आहेत आणि तेथील प्रवाशांची संख्या किती आहे, याचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

एक सरकता जिना बसवण्यासाठी एक कोटी खर्च येतो. रेल्वेकडे 37 सरकते जिने बसवण्याचा आराखडा तयार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील कामाच्या निविदांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लिफ्टची सोय
सीएसटी स्थानकात लिफ्ट बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याच धर्तीवर आणखी 16 ठिकाणी लिफ्ट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांची सोय होईल. एक लिफ्ट बसवण्यासाठी 90 लाख खर्च येतो.

Web Title: Central Railway station will 18 moving steps