Mumbai News: लोकलमधून उतरताना तोल गेला, तरुणीला पाहताच महिला टीसी देवदूतासारखी धावत आली अन्...; डोंबिवली स्थानकात काय घडलं?

Dombivli Railway Station TC Video: डोंबिवली स्थानकावर ट्रेनमधून उतरताना पडून जखमी तरुणीसाठी तिकीट तपासनीस वृषाली सावंत जाधव देवदूत ठरल्या.
Dombivli Railway Station TC Video

Dombivli Railway Station TC Video

ESakal

Updated on

मुंबई : डोंबिवली स्थानकावर ट्रेनमधून उतरताना पडून जखमी झालेल्या तरुणीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनीस वृषाली सावंत जाधव या देवदूत ठरल्या. गर्दीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीस त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उचलून स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने वेळेत उपचार मिळू शकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com