esakal | आजपासून ट्रान्स हार्बरवर एसी लोकल पूर्ववत धावणार | AC Train
sakal

बोलून बातमी शोधा

AC-Local

आजपासून ट्रान्स हार्बरवर एसी लोकल पूर्ववत धावणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेने (central railway) ट्रान्स हार्बरवरील ठाणे- वाशी- पनवेल (Thane-vashi-panvel) मार्गावर गुरुवारपासून (ता. ७) एसी लोकल (AC train) पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार दिवसभरात एसी लोकलच्या १६ फेऱ्या धावणार आहेत.
ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल सोमवार ते शुक्रवारपर्यंत १६ फेऱ्या धावणार असून शनिवारी या लोकलच्या वेळेवर साध्या लोकल धावतील.

हेही वाचा: अंबरनाथ : पावसात उद्यानाची भिंत पडून एकाचा मृत्यू एक गंभीर

रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सायंकाळी ५.४६ ची ठाणे-नेरूळ आणि सायंकाळी ५.५४ नेरूळ-ठाणे या दोन लोकल वगळता इतर गाड्या धावणार नाहीत. या दोन गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील. या सेवांमुळे ट्रान्स-हार्बरवरील लोकलच्या फेऱ्यांची संख्या २४६ वरून २६२ पर्यंत वाढेल आणि मध्य रेल्वेच्या एकूण फेऱ्यांची संख्या १,६८६ वरून १,७०२ पर्यंत वाढेल. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असेल, तसेच प्रवाशांनी लोकलमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.

loading image
go to top