दर अडीच मिनिटाला धावणार एक लोकल? हार्बर प्रवाशांना मिळणार का खुशखबर?

दर अडीच मिनिटाला धावणार एक लोकल? हार्बर प्रवाशांना मिळणार का खुशखबर?

Published on

मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आता हार्बर रेल्वे मार्गावरून दर 150 सेकंदानंतर एक ट्रेन धावताना पाहायला मिळू शकते. असं झाल्यास मध्य रेल्वेला हार्बर रेल्वेवर साडेचार हजार फेऱ्या सोडाव्या लागणार आहेत. सध्या या मार्गावर तीन हजार फेऱ्या चालवल्या जातायत. यासाठी अद्ययावत अशी CBTC यंत्रणा वापरण्यात येणार आहे. CBTC म्हणजेच कम्युनिकेशनवर आधारीत ट्रेन कंट्रोल सिस्टीमची पूर्णपणे अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच या फेऱ्या वाढवण्यात येऊ शकतात. 

सध्या मुंबईत वापरण्यात येणारी सिग्नल यंत्रणा ही जुनी आहे.  यामध्ये बदल करून अद्ययावत यंत्रणा उभारण्याचा विचार केला जातोय. मात्र ही यंत्रणा मुंबईत सर्व मार्गांवर वापरायची झाल्यास तब्बल सहा हजार कोटींच्या निधीची आवशकता लागणार आहे. CBTC यंत्रणा मुंबईमध्ये लागू करण्याबाबत विचाराधीन असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.  

कम्युनिकेशनवर आधारीत ट्रेन कंट्रोल सिस्टीम ( CBTC ) म्हणजे काय ? 

  • या नवीन सिस्टीमच्या आधारे ट्रेन्सना सिग्नल खांबांची आवशकता भासणार नाही. 
  • या नवीन सिस्टीमच्या आधारे लोकलमध्येच सर्व सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणं शक्य होणार आहे
  • या यंत्रणेमुळे लोकलचा वेग वाढण्यास मदत होतो.. 

दरम्यान आता नवीन यंत्रणेची अंमलबजावणी झाल्यास मुंबईकरांना मध्य रेल्वेकडून गिफ्ट मिळेल असं बोललं जातंय. हार्बर मार्गावरचा ताण पाहता मध्य रेल्वेनं हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

Webtitle : central railway is thinking to increase frequency of local trains on harbour track with the help of CBTC

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com