Central Railway: मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! मेल-एक्स्प्रेस, लोकलमध्ये चेन पुलिंगच्या सहा घटना; काय घडलं?

Central Railway Timetable Disruption: दिवाळीच्या सुट्ट्यांत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असतानाच मध्य रेल्वेवर चेन पुलिंगच्या सहा घटना घडल्या. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाल्याचे समोर आले.
Mumbai Local

Mumbai Local

sakal

Updated on: 

मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढलेली असतानाच मध्य रेल्वेवर चेन पुलिंगच्या सहा घटना घडल्या. पाच मेल-एक्स्प्रेस आणि एका लोकलमध्ये चेन पुलिंग झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले. या घटनांमुळे संबंधित गाड्या थांबवाव्या लागल्या. त्याचा परिणाम मागून येणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही झाला.

Loading content, please wait...