Mumbai local train
esakal
मुंबई
Mumbai Local: नववर्षी मध्य रेल्वेचा प्रवास होणार खास! १५ डब्यांच्या लोकलसह जादा फेऱ्या सुटणार; कधी होणार वेळापत्रक जारी?
Central Railway: मुंबई रेल्वेच्या १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक लांबणीवर पडणार आहे.
मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वेच्या १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक मार्चमध्येच लागू होणार आहे. त्यात १५ डब्यांच्या १० ते १२ अतिरिक्त लोकलसह एका नव्या एसी लोकलमुळे १२ अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

