

Central Railway Special Train
ESakal
मुंबई : नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष नियोजन केले आहे. अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेकडून एकूण ७६ हिवाळी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या मुंबई व पुण्याहून कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ, विदर्भ तसेच राजस्थानकडे धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.