
Mumbai Local Power Block
ESakal
मुंबई : कर्जत यार्डमध्ये ओव्हरहेड वायर (ओएचई) व अभियांत्रिकी कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी (ता.६) वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे. या कामांमुळे कर्जत ते खोपोली या मार्गावरील काही लोकल सेवांवर परिणाम होणार असून प्रवाशांना यामुळे तात्पुरती गैरसोय होणार आहे.