
मुंबई लोकलबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. आंबिवली ते टिटवाळा दरम्यान रेल्वे रुळाशेजारील गवताला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. या आगीत रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या केबल्स जळून खाक झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल आणि मेल गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.