मध्य रेल्वेला आता यातूनही मिळणार महसूल...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

रेल्वेच्या संरक्षक भिंतींवरही जाहिराती

मुंबई : मध्य रेल्वेवरील संरक्षक भिंतींवरही खासगी जाहिराती दिसणार आहेत. पहिल्या टप्प्यात चिंचपोकळी व करी रोड स्थानकांत जाहिराती लावण्याचे कंत्राट दिले जाणार असून, त्याद्वारे मध्य रेल्वेला वार्षिक ४० लाख रुपये महसूल मिळेल असे सांगण्यात आले.

"कसाबच्या हातात होतं हिंदूंचं पवित्र बंधन" कसाबबद्दल राकेश मारिया म्हणतात...

मुंबई उपनगरी रेल्वेच्या तिकीटदरांत वाढ न करता जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यावर रेल्वेमंत्र्यांनी भर दिला आहे. लोकलमधून दररोज ५० लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. अनेक प्रवासी दररोज तीन ते पाच तास लोकलमध्ये घालवतात. रेल्वेस्थानके, लोकलचा आतील व बाहेरील भाग, फलक, एलसीडी, तिकीट आरक्षण केंद्र आदी ठिकाणी जाहिराती करण्यात येतात.

महाविकास आघाडीतील 'दोन' मंत्र्यांचा घेतला राजीनामा ?

आता मध्य रेल्वेने जाहिरातींसाठी पूल (रोडओव्हर ब्रिज) आणि संरक्षक िंभंतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांलगत खासगी जाहिराती लावण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामधून रेल्वेला वार्षिक ४० लाख रुपये उत्पन्न मिळेल. मराठी नाटके, चित्रपट आणि खासगी कंपन्यांच्या जाहिराती संरक्षक भिंतींवर झळकतील. रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशांनुसार महसूल वाढवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

"गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त अन्य माध्यमांतून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

जाहिरातींद्वारे कमाई
वर्ष                     महसूल
२०१२-१३         ३० कोटी १० लाख
२०१३-१४         ४२ कोटी ४ लाख
२०१४-१५         ४१ कोटी ३१ लाख
२०१५-१६         ४२ कोटी ६१ लाख
२०१६-१७         ४५ कोटी १६ लाख
२०१७-१८         ५२ कोटी २५ लाख
२०१८-१९         ५७ कोटी ४७ लाख

Central Railway will now generate revenue from ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Railway will now generate revenue from ...