मध्य रेल्वेच्या ऑटोमॅटिक तिकीट यंत्राचे तीन तेरा

मध्य रेल्वेच्या ऑटोमॅटिक तिकीट यंत्राचे तीन तेरा

मुंबई : तिकीट खिडक्‍यांवरील गर्दी कमी व्हावी, प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी मध्य रेल्वेने स्थानकांत बसवलेली अनेक स्वयंचलित तिकीट यंत्रे (ऑटोमॅटिक टिकेट व्हेंडिंग मशीन - एटीव्हीएम) बोजवारा उडाला आहे. एकूण ६०२ पैकी १२५ एटीव्हीएम बंद पडल्यामुळे प्रवाशांना तिकिटांसाठी खिडक्‍यांपुढे रांगा लावाव्या लागत आहेत. 

मध्य रेल्वेवरून दिवसाला सुमारे ४५ लाख नागरिक प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोईसाठी प्रत्येक स्थानकात एटीव्हीएम बसवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना स्मार्ट कार्डद्वारे या यंत्रातून तिकीट घेता येते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि अतिरिक्त मानवी श्रमाची बचत होते. मोबाईल तिकिटाची प्रतही या एटीव्हीएममधून मिळते; परंतु काही महिन्यांपासून अनेक एटीव्हीएममध्ये सतत बिघाड होत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. 

मध्य रेल्वेने मुंबई विभागातील स्थानकांत बसवलेल्या एकूण ६०२ पैकी ४७७ एटीव्हीएम सुरू आहेत. त्यांतील ५० ते ६० यंत्रांत सतत बिघाड होतो. मुलुंड आणि ठाणे या स्थानकांतील अनेक एटीव्हीएम पावसाचे पाणी गेल्यामुळे बंद पडल्या आहेत. यूपीएस यंत्रणेत सतत बिघाड होत असल्यामुळे या स्थानकांत नवीन एटीव्हीएम बसवण्याची गरज आहे. आणखी २०० एटीव्हीएमची गरज असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच सांगितले. 

प्रवाशांचे हाल 

मुलुंड स्थानकातील तीन एटीव्हीएम बंद असल्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना खिडक्‍यांपुढे रांग लावावी लागते. योग्य देखभाल होत नसल्याने ही यंत्रे वारंवार बंद पडतात, असे सांगण्यात आले. दोन महिन्यांपासून एटीव्हीएम सतत बंद पडत असल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत, असे प्रवासी राखी पाटील यांनी सांगितले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com