शुद्ध हवेसाठी मध्य रेल्वे बनवणार ऑक्‍सिजन पार्लर

शुद्ध हवेसाठी मध्य रेल्वे बनवणार ऑक्‍सिजन पार्लर

जगभरात पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अशात सातत्याने होणारी वृक्षतोड, दिवसागणिक वाढणाऱ्या गाड्यांची संख्या, सिमेंट कॉंक्रीटच्या टोलेजंग इमारती अशा काही गोष्टींमुळे पर्यावरणाची हानी होतेय. अशात आपल्याला किमान शुद्ध हवा मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा.  अशात अनेक जणांना आपल्या घराच्या आसपास ऑक्सिजन देणारी झाडं असावीत असं वाटत असतं. मात्र नक्की कोणती झाडं आपल्याला ऑक्सिजन देऊ शकतात? खरच ती झाडं मान्यताप्राप्त आहेत का? असे एक न अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात आणि आपला हा प्लान तिथेच थांबतो. पण आता चिंता करू नका.  

मध्य रेल्वे आपल्या विभागात ऑक्‍सिजन पार्लर (रोप वाटिका)  उभारणार आहे. या पार्लरच्यामाध्यमातून नासाकडून मान्यता प्राप्त झालेल्या 18 प्रकारची रोपविक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड येथे सुरू करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक 75 हजार रुपयाचा महसूल मिळणार आहे. 

मध्य रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नव-नवीन कल्पना घेऊन येत असते. आता पर्यावरण रक्षणासाठी 'झाडे वाढवा, पर्यावरण वाचावा' ही मोहीम देशभरात सुरु आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी एक महत्वपूर्ण योजना आखली असून हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्‍सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहे.

यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकांत सुरु होणार आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्‍स अँड स्पेस एंड अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) कडून मान्यताप्राप्त 18 प्रकारचे सर्वाधिक ऑक्‍सिजन देणारे रोपटे असणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातवरण प्रवाशांना मिळणार आहे. इतकंच नव्हे तर या वाटिकेतून प्रवाशांना रोपटे विकत सुद्धा घेता येणार आहे. यांची किंमत 200 ते 500 रुपयांपर्यत असणार आहे.

भारतीय रेल्वेचं उप्तादन वाढीसाठी 'न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम' ( NINFRIS ) मार्फत अनेक योजना आखत आहे. त्यातील हा एक भाग म्हणून ऑक्‍सिजन पार्लर सुरु करण्यात आले आहे. यांचे कंत्राट सुद्धा देण्यांत आले आहे. ऑक्‍सिजन पार्लरच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला 75 हजार रुपयाचा महसूल मिळणार आहे. रेल्वे स्थानकांत पर्यावरण स्नेही वातवरण निर्माण करण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात ऑक्‍सिजन पार्लर सुरु करत आहे. या पार्लरमध्ये जास्त ऑक्‍सिजन देणारे रोपटे असणार आहे. ते प्रवाशांना सुद्धा मुभलक दरात विकत घेता येणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

सुरुवातीलामध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकात हवा शुद्धीसाठी आणि पर्यावरणासाठी ऑक्‍सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहे. ऑक्‍सिजन पार्लर असलेले नाशिक रोड रेल्वे स्थानकात हे भारतातील पाहिलं-वाहिलं अशा प्रकारचं रेल्वे  स्थानक असणार आहे. यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरसुद्धा ऑक्‍सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वे जागेची पाहणी करत आहे. लवकरच सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा प्रवासी ऑक्‍सिजन पार्लरमधून रोपटे विकत घेऊ शकता येणार. 

WebTitle : central railways to start sale of oxygen plant on various railway stations   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com