

ceremonial lamp flared in Thane Event
ESakal
ठाणे : ठाण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना अचानक व्यासपीठावरील समईने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचे समोर आले. समईचा भडका उडताच मंत्री प्रताप सरनाईक यांनी सतर्कता दाखवत जवळच असलेले फुलं घेऊन आगेवर टाकून समई विझवली, ज्यामुळे मोठी हानी टळली. परंतु या प्रकारामुळे कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.