File Photo
File Photo

प्रवेश अर्जासोबतच हवे जातवैधता प्रमाणपत्र

नवी मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गातून लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश अर्ज सादर करताना त्यासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

सध्या २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १२वीच्या विज्ञान शाखा व डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी जातप्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत समितीकडे पाठवावा लागणार आहे. त्याकरिता प्रशासनाने त्यांना ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतची मुदत जाहीर केली आहे.

तसेच शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी/पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे विहीत मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत सूचना देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जातवैधता प्रमाणपत्र समितीला वेळेवर अर्ज प्राप्त होऊन मुदतीत नियमानुसार कार्यवाही पूर्ण करून समिती निर्णय/जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यास मदत होईल.

त्याकरिता अर्जदारांनी www.Barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरून त्याची प्रिंट काढून सर्व पुरावे व विहीत नमुन्यातील शपथपत्रासह अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांचे जातीचे प्रमाणपत्र देणे व पडताळणी करणे सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे.

विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत पुराव्यासह परिपूर्ण अर्ज समितीकडे सादर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्रुटी असलेली प्रकरणे जातप्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत निकाली काढले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com