सीईटीसाठी आज लाइव्ह समुपदेशन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

नवी मुंबई - राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी व ऍग्रिकल्चर शाखेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांकरता आगामी कॉमन एंट्रेस टेस्टच्या (सीईटी) पार्श्‍वभूमीवर राज्य सीईटी विभागातर्फे शनिवारी (ता. 21) सकाळी नऊ वाजता शिबिर घेण्यात येणार आहे. ऐरोलीतील पार्थ नॉलेज नेटवर्क यांच्या व्हर्च्युअल स्टुडिओमधून त्याचे लाइव्ह समुपदेशन संबंधित महाविद्यालयामध्ये थेट प्रसारित होणार आहे.

सीईटीच्या दृष्टीने अनुभवी शिक्षक, तज्ज्ञ अधिकारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन करणार आहेत. डायरेक्‍टोरेट ऑफ टेक्‍निकल एज्युकेशन (मुंबई) आणि महाराष्ट्र कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पुणे) यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी शिबिर होणार आहे. पार्थ नॉलेज नेटवर्ककडून तांत्रिक मदत मिळालेल्या शिबिरात दिले जाणारे समुपदेशन इंटरऍक्‍टिव्ह असल्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन होईल. संबंधित विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी http:dtemaharashtra.gov.in/mhtcet2018/ लिंकला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: CET live Counseling