भीषण ! ३२ वार करत पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीचा खेळ केला खल्लास...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 February 2020

नवी मुंबई - उरणच्या चिरनेर हद्दीतील टाकिगाव बस स्थानक रानसई मार्गावर मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा तपास उरण पोलिसांनी अवघ्या अठरा तासात पूर्ण केला आहे. या खून प्रकरणी दोन महिलांना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवी मुंबई - उरणच्या चिरनेर हद्दीतील टाकिगाव बस स्थानक रानसई मार्गावर मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा तपास उरण पोलिसांनी अवघ्या अठरा तासात पूर्ण केला आहे. या खून प्रकरणी दोन महिलांना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रानसई मार्गावर सोमवारी (ता.24) एका उकिरड्यावर  महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा धारधार शस्त्राने खून केल्याचे निदर्शनात आल्याने उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखली उरण पोलिसांनी तपास सुरु केला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या शरीरावर एक दोन नव्हे तब्बल ३२ वार करण्यात आले होते.

मोठी बातमी - तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

या महिलेच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर व्हायरल फोटोवरून तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यानंतर अवघ्या 18 तासात हा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मृत महिला जया तुकाराम घाणेकर हिचे पती मयत झाल्यानंतर मुक्तार हुसेन अली संग्राम यांच्या सोबत प्रेम विवाहातून लग्न झाले होते; मात्र त्याची पहिल्या पत्नीला ते अमान्य होतं. त्यामुळे आरोपी महिला आणि मयत महिला या दोघींचे नेहमीच वाद होत असे. अखेर आरोपीने तिची मुलगी व मित्रासोबत संगनमताने जया हिचा खून केला. तसेच मानसरोवर येथील घरातून चिरनेर रसत्यावर मृतदेह फेकून दिला; मात्र उरण पोलिसांनी दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपीचा मित्राचा शोध सुरु आहे.

मोठी बातमी -  फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही...
 
या गुन्हाचा तपासामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी काठे, कावळे, वृषाली पवार, पोलिस उप निरीक्षक अनिल चव्हाण, गोपनीय विभागातील सचिन केकरे, संतोष मोहिते, संजय कुथे, सुनील मोहिते, पुषोत्तम मराडे, उमेश कराले, घनश्‍याम पाटील, पोलिस हवलदार नीता डाउर यांनी अधिक मेहनत घेतली. 

ex wife took revenge from current wife attacked with sharp tool 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex wife took revenge from current wife attacked with sharp tool