उल्हासनगरात प्रथमच डॉ.आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

दिनेश गोगी
गुरुवार, 12 एप्रिल 2018

उल्हासनगर : शिवसेनेच्या पुढाकाराने उल्हासनगरात प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. उद्या 13 तारखेपासून ते 30 तारखेला असणाऱ्या बुद्धपोर्णिमा पर्यंत प्रदर्शनातील बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे बघण्याच्या संधीचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केले आहे.

उल्हासनगरमध्ये सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती जल्लोषपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. त्याअनुषंगाने 13 व 14 तारखेला आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

त्यानंतर नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी सम्राट अशोक नगर, मुकुंद नगर, भीमनगर, तेजुमल चक्की जवळ, आझाद नगर, चोपडा, शांतीनगर, हिरघाट आदी परिसरात बुद्धपौर्णिमा असलेल्या 30 एप्रिलपर्यंत छायाचित्रांचे प्रदर्शन होणार असल्याचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Chance to see rare photos of Dr Babasaheb Ambedkar