

Chandipura Virus
ESakal
मुंबई : गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूच्या संसर्गाची स्थिती गंभीर होत असताना मुंबई महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबईत सध्या चांदीपुरा विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी संभाव्य रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी कस्तुरबा रुग्णालयात १० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्याची तयारी पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे.