

Maharashtra land survey system
ESakal
महाराष्ट्रातील जमीन मोजणीबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुती सरकार अशी प्रणाली लागू करणार आहे जी पुढील दोन वर्षांत जमीन सर्वेक्षण फक्त १५ दिवसांत पूर्ण करणार आहे. याची योजना सरकार आखत आहे. ही सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नोंदणी होणार आहे. सरकार या दिशेने पुढे जात असल्याचे ते म्हणाले आहे.