Chandrashekhar Bawankule | दरेकरांनंतर आता बावनकुळेंवर निशाणा, महाविकास आघाडीचा 'काऊंटर प्लॅन?' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule

दरेकरांनंतर आता बावनकुळेंवर निशाणा, महाविकास आघाडीचा 'काऊंटर प्लॅन?'

राज्यात महाविकास आघाडी आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या चौकश्यांचं सत्र सुरू झालं आहे. सक्तवसुली संचलनालय, आयकर विभाग, सीबीआय या केंद्रीय संस्था राज्यातील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रकरणात सक्रिय झाल्या आहेत. तर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला.

या छाप्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यातील तपास यंत्रणा भाजपच्या नेत्यांच्या पाठिशी लावल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. यातच आता चंद्रशेखर बावनकुळेंची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट झाल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.

हेही वाचा: सीमकार्डच्या माध्यमातून विद्युत निर्मितीत भ्रष्टाचार; बावनकुळेंचा गौप्यस्फोट

विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना मुंबई बँकेच्या प्रकरणात हजर व्हायला सांगितलं आहे. याला काही तास उलटून गेल्यानंतर बावनकुळेंवरही कारवाई होणार असल्याचं स्पष्ट झालं. तीन महिन्यांपूर्वी बावनकुळेंची विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर लगेच त्यांना राज्य सरकारने दणका दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना महावितरणकडून करण्यात आलेल्या कामांची चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

यासाठी तत्काळ तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये महावितरणच्या तीन संचालकांना नियुक्त करण्यात आलंय. महावितरण कंपनीचे वित्त संचालक या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर संचलन विभागाचे संचालक आणि कार्यकारी संचालकांचा या समितीत समावेश करण्यात आलाय. चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देखील राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.

Web Title: Chandrashekhar Bawankule Will Be Investigated In Mseb Probe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :chandrashekhar bawankule