बॉम्बे हायकोर्ट नको, 'हे' नाव ठेवा..माजी न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात याचिका... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

मुंबई शहर हे बॉम्बे या नावानंही ओळखलं जातं. त्यावरूनच बॉम्बे हायकोर्ट असं नाव देण्यात आलं होतं. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाचे हायकोर्ट औफ बॉम्बे हे नाव बदलून हायकोर्ट ऑफ महाराष्ट्र असे ठेवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका माजी न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

मुंबई : मुंबई शहर हे बॉम्बे या नावानंही ओळखलं जातं. त्यावरूनच बॉम्बे हायकोर्ट असं नाव देण्यात आलं होतं. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाचे हायकोर्ट औफ बॉम्बे हे नाव बदलून हायकोर्ट ऑफ महाराष्ट्र असे ठेवावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका माजी न्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

कामगार न्यायालयाचे  प्रधान न्यायाधिश म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्ही पी पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. पाटील सुमारे सव्वीस वर्षे न्यायाधीश पदावर होते. महाराष्ट्र या शब्दामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

हेही वाचा: बाप रे!  खासगी लॅबमध्ये येतायत अधिक पॉझिटिव्ह रिपोर्ट्स..सरकारी लॅबपेक्षा 'इतके' टक्के अधिक पॉझिटिव्ह रुग्ण..

महाराष्ट्राचा प्राचीन  वारसा  याद्वारे जतन केला जातो, त्यामुळे राज्य घटनेच्या अनुच्छेद 19, 21 आणि 29 नुसार महाराष्ट्र हे नाव उच्च न्यायालयाला योग्य आहे, असा दावा याचिकेत केला आहे. शिवाय राज्याच्या नावाला साधर्म्य असलेले नाव असेल तर नागरिकांना संभ्रम ही वाटणार नाही, असा दावा याचिकेत केला आहे.

उच्च न्यायालयांंच्या नावात सुधारणा करणारे विधेयक केन्द्र सरकारने सन 2016 मध्ये मंजूर केले आहे. त्यानुसार कलकत्ताचे कोलकाता आणि मद्रासचे चेन्नई करण्यात आले आहे, असाही दाखला याचिकेत दिला आहे. राज्याच्या नावाप्रमाणेच उच्च न्यायालयाचे नाव असणे हा स्वायत्त अधिकार आहे, त्यामध्ये बदल होऊ शकत नाही, असा दावा केला आहे.

हेही वाचा: पालिकेची बस पाहताच घराला लाॅक लावून नागरिकांनी ठोकली धूम, वाचा नेमके काय घडले

महाराष्ट्रातील नागरिकांची ही मागणी मागील कित्येक वर्षांपासून आहे, त्यामुळे कायद्यानुसार यावर कार्यवाही करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाला दिडशे वर्षांचा ऐतिहासिक आणि सन्मानाचा वारसा आहे..

change name of bombay high court to high court of maharashtra read full story  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: change name of bombay high court to high court of maharashtra read full story