बाप रे!  खासगी लॅबमध्ये येतायत अधिक पॉझिटिव्ह रिपोर्ट्स..सरकारी लॅबपेक्षा 'इतके' टक्के अधिक पॉझिटिव्ह रुग्ण..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

राज्यात सरकारी तसेच खासगी लॅब मध्ये कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. खासगी लॅब पेक्षा सरकारी लॅब मध्ये कोरोना टेस्ट अधिक झाल्या असल्या तरी खासगी लॅब मधील पॉझिटिव्ह रिपोर्ट्स

मुंबई: राज्यात सरकारी तसेच खासगी लॅब मध्ये कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. खासगी लॅब पेक्षा सरकारी लॅब मध्ये कोरोना टेस्ट अधिक झाल्या असल्या तरी खासगी लॅब मधील पॉझिटिव्ह रिपोर्ट्स 4 टक्क्यांनी अधिक असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 44,8661 इतक्या कोरोना टेस्ट झाल्या. त्यातील 24,1089 टेस्ट सरकारी लॅब मध्ये तर 20,7572 टेस्ट खासगी लॅबमध्ये करण्यात आल्या. सरकारी लॅब मधील 86.93 टक्के म्हणजेच 20,9567 टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत तर खासगी लॅबमधील 82.31 टक्के म्हणजेच 17,0858 टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. सरकारी आणि खासगी अश्या दोन्ही लॅब मिळून 84.79 टक्के  म्हणजेच 38,0425 टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. 

 मोठी बातमी! यावर्षी 'अशी' असणार बाप्पाची मूर्ती..परळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

दोन्ही लॅब मधील 15.21 टक्के म्हणजेच 68,236 टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात सरकारी लॅब मधील 13.7 टक्के म्हणजेच 31,522 तर खासगी लॅब मधील 17.69 टक्के म्हणजेच 36,714 टेस्टचा समावेश आहे. सरकारी लॅब पेक्षा खासगी लॅब मधील पॉझिटिव्ह टेस्ट चे प्रमाण हे  4.62 टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यात आतापर्यंत 73 सरकारी लॅब मध्ये टेस्टिंग करण्यात आल्या तर काही ठराविक 4 खासगी लॅब ना टेस्टिंगची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी लॅब मध्ये टेस्टसाठी अधिक ताण असल्याने रिपोर्ट यायला उशीर होतोय. त्या तुलनेत खासगी लॅब मधील रिपोर्ट काही तासांत येतात. त्यामुळे खासगी लॅब मधून टेस्ट करून घेण्याकडे रुग्णांचा कल वाढला आहे.

हेही वाचा: मुंबईत कसा असेल 5.0 लॉकडाऊन? संध्याकाळी होणार महत्वपूर्ण निर्णय

कोरोना टेस्ट प्रकरणी दोन्ही लॅब कडून एकमेकांकडे बोट दाखवण्यात येतेय. खासगी डॉक्टर किंवा लॅब मधील रिपोर्ट्स स्वीकारायला सरकारी अधिकारी तयार नसल्याचे काही खासगी डॉक्टरांकडून सांगितले जातंय तर एखाद्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ही त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना खासगी लॅब चालक देत नसल्याचे काही अधिकारी सांगतात. दोन्ही प्रकरणांत रुग्णाची मात्र फरफट होत असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

number of positive reports are more in private labs than government labs 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of positive reports are more in private labs than government labs