esakal | पत्रीपूल गर्डर लॉन्चिंगसाठी रात्रीच्या वाहतुकीत बदल, अधिसूचना जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रीपूल गर्डर लॉन्चिंगसाठी रात्रीच्या वाहतुकीत बदल, अधिसूचना जाहीर

गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबर आणि 28 आणि 29 नोव्हेंबरला मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 च्या काळात पत्री पूलवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मध्य रेल्वे रात्रीचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पत्रीपूल गर्डर लॉन्चिंगसाठी रात्रीच्या वाहतुकीत बदल, अधिसूचना जाहीर

sakal_logo
By
रविंद्र खरात

मुंबईः  गेल्या 2 वर्ष रखडलेल्या नवीन पत्री पुलाच्या कामाला वेग आला आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबर आणि 28 आणि 29 नोव्हेंबरला मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 च्या काळात पत्री पूलवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने मध्य रेल्वे रात्रीचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेली 2 वर्ष रखडलेल्या नवीन पत्रीपुलाचे काम अंतिम टप्यात असून भव्य गर्डर लॉन्चिंग करण्यासाठी मध्य रेल्वेने 21 , 22 आणि 28 , 29 नोव्हेंबरला एकूण 14 तासांचा मेगाब्लॉकला तत्वता मान्यता दिली असली तरी वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 या काळात पत्री पूलवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे ही रात्रीचा मेगाब्लॉक घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवीन पत्रीपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन बाजूच्या पुलावर ठेवून गर्डर ठेवण्याचे काम सोमवारी16 नोव्हेंबर ते रविवार 22 नोव्हेंबरला रात्री 10 ते पहाटे 5 या काळात काम करण्यात येणार असल्याने या परिसरमधील वाहतूक बदल केले आहे.

अधिक वाचा-  गोराई डंम्पिंगवरही कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा विचार

बदल असा

  • कल्याणमधून पत्री पूल मार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या जड / अवजड वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून रांजनोली नाका भिवंडी येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून खारेगाव टोलनाका- मुंब्रा बायपास मार्गे पुढे जावे.
  • कल्याण शहरातून पत्री पूल मार्गे शिळफाटा कडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी दुर्गामाता चौकातून डाव्या बाजूने आधारवाडीचौक, खडकपाडा चौक भवानी चौक (प्रेम ऑटो सर्कल), नेताजी सुभाष चौकमधून पुढे इच्छित स्थळी जातील.
  • कल्याण- नगर महामार्गावरून पत्री पूलमार्गे शिळफाटा रोडकडे जाणाऱ्या वाहनांना कल्याणमधील सुभाष चौकात बंदी असेल. या मार्गावरील वाहनांनी सुभाष चौकात डाव्या बाजूने वालधुनी ब्रीज वरून इच्छित स्थळी जातील.
  • कल्याण शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम आणि पूर्वेस जोडणारा जुना पत्री पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहनांना कल्याण पूर्वेकडील सूचक नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
  • बदलापूर आणि तळोजाकडून खोणी मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या जड अवजड वाहन धारकांनी खोणी तळोजा कल्याण फाटा शिळफाटा मुंब्रा खारेगाव टोल नाका या मार्गाने इच्छित स्थळी जातील. तर कल्याण फाट्या कडून कल्याण पश्चिमेला जाणारी हलक्या वाहनधारकांनी कल्याण पूर्व सूचक नाका येथून उजवीकडे वळून पुढे जातील. 
  • 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 या काळात पत्रीपुलाच्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल केले असल्याने नागरिकांनी पर्यायी वाहतुकीचा उपयोग करावा असे आवाहन कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी केले आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Changes in night traffic for Patripool girder launch notification announced