
Metro 3
ESakal
मेट्रो मार्गिका ७ बाबत मोठी बातमी समोर आली आहे. या मेट्रो सेवाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मेट्रो मार्गिका ७ (गुंदवली–ओवरीपाडा) आणि मार्गिका ९ (दहिसर पूर्व–काशीगाव) यांच्या प्रणाली एकत्रीकरण (System Integration) आणि सुरक्षा चाचण्यांसाठी १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मेट्रो मार्गिका २ए आणि ७ या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या सेवांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.