

Ruckus Erupts in Thane BJP Office Over Candidate Selection
sakal
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या तोंडावर उमेदवारीवरून भाजपत असंतोष उफाळून आला. सोमवारी (ता. २९) रात्री पक्षाने जाहीर केलेल्या यादीतून अनेक माजी नगरसेवकांची नावे कापण्यात आल्याने त्यांनी थेट भाजप कार्यालय गाठून राडा केला. या वेळी कार्यालयात तोडफोडही करण्यात आली. पैसे घेऊन उमेदवारी विकल्याचा गंभीर आरोपही या वेळी करण्यात आला.