झाकीर नाईकवर 'ईडी'कडून गुन्हा नोंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई : वादग्रस्त धर्म प्रचारक झाकीर नाईक व त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ता कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नाईक व संबंधितांवर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले होते. याच्या आधारावर आज "ईडी'ने हा गुन्हा नोंदविला. नाईक व संबंधितांवर काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप असून, त्याची चौकशी "ईडी'कडून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ढाका हल्ल्यातील एका आरोपीने आपण झाकीर नाईक याच्या भाषणावरून प्रेरित झालो, असे स्पष्ट केल्यानंतर नाईक सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला होता. त्याच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संस्थेची विविध कार्यालये व निवासस्थानांवर छापे टाकले होते.

Web Title: chargesheet against zakir naik by ed