"आरोपपत्र' पुस्तिकेचे कॉंग्रेसकडून प्रकाशन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या कार्यकाळात विविध विभागांत झालेला गैरव्यवहार मुंबईतील नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी मुंबई कॉंग्रेसने शिवसेना-भाजपविरोधात आरोपपत्र पुस्तिका तयार केली आहे. खासदार शशी थरूर यांच्या हस्ते सोमवारी पुस्तिकेचे प्रकाशन झाले. 

""मुंबईतील मतदारांनी शिवसेना-भाजपला महापालिकेत चार वेळा संधी दिली. पाणी, रस्ते, कचरा, शिक्षण, सांडपाणी, क्षेपणभूमी या मूलभूत सोयीसुविधा देण्यात शिवसेना-भाजप अपयशी ठरले. आता कॉंग्रेसला संधी देऊन पाहा, मुंबईत बदल घडेल,'' असे थरूर या वेळी म्हणाले. पाच वर्षे मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षण झालेले नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत मुंबईतील नागरिकांनी जाब विचारायला हवा, असेही ते या वेळी म्हणाले. 
भाजपने शिवसेनेवर आरोपपत्र तयार करणे ही खूप मोठी थट्टा आहे. पालिकेतील सर्व गैरव्यवहारांत दोघेही सहभागी आहेत, असा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. या वेळी मुंबईचे माजी सहपोलिस आयुक्त सुरेश मराठे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Web Title: Chargesheet booklet published by the Congress