

Asiatic Town Hall
ESakal
मुंबई : एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीने अपेक्षेप्रमाणे राजकीय वळण घेतले आहे. २७ सप्टेंबरनंतर संस्थेचे सदस्यत्व मिळालेल्या सभासदांना ८ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. २७ नोव्हेंबरपर्यंत आलेले अर्ज आणि ३ ऑक्टोबरपर्यंत ज्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली, त्यांनाच मतदानाचा अधिकार मिळेल, असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. या निर्णयामुळे सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी उभे असलेले विनय सहस्रबुद्धे यांना आणि त्यांच्या पॅनेलला बळ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.