

Mumbai Car Lift Collapsed
ESakal
मुंबई : मुंबईतील चारकोप परिसरात एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये कार लिफ्ट कोसळून मोठी घटना घडली आहे. ज्यामध्ये एक कार २५ फूट खोल पार्किंगमधील लिफ्टच्या शाफ्टमध्ये कोसळल्याने चालक जखमी झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अवघ्या दोन वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीची कार लिफ्ट कोसळल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभारले जात आहेत.