esakal | CSMT रेल्वे स्थानकला फाइव्ह-स्टारचा दर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

CSMT रेल्वे स्थानकला फाइव्ह-स्टारचा दर्जा

मध्य रेल्वेला 'ईट राईट' स्टेशन प्रमाणपत्र 

CSMT रेल्वे स्थानकला फाइव्ह-स्टारचा दर्जा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाला आज फाइव्ह-स्टारचा दर्जा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना आरोग्य पूर्ण अन्नपदार्थांचा पर्याय निवडण्यासाठी योग्य खाद्यपदार्थ रेल्वे स्थानक मोहीम रेल्वे मंत्रालयाने राबविली. 'इट राईट इंडिया' या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेचे पहिले 'इट राईट' स्टेशन ठरले आहे. बुधवारी फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्डस अथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक डॉ. योगेश कामत यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांना फाइव्ह-स्टार रेटिंगसह ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. 

मोठी बातमी - जेंव्हा देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीसांच्या पगाराबद्दल बोलतात...

रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यात मिळणारे खाद्यपदार्थ आणि जेवण स्वच्छ आणि आरोग्यदायी मिळावे यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष प्रयत्न सुरु आहे. इट राइट स्थानक बनविण्याची रेल्वे आणि इंडियन केटरिंग ऍन्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) विशेष प्रयत्न सुरु आहे. दरम्यान प्रवाशांना आरोग्यासाठी आणि योग्य अन्न निवडीसाठी मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने फूड सेफ्टी अँड स्टॅंडडर्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय ) 2018 मध्ये सुरू केलेल्या ईट राइट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून ईट राईट स्टेशन ही चळवळ सुरू केली. या चळवळी अंतर्गत मध्य रेल्वेचे पहिले सीएसएमटी रेल्वे स्थानक ईट राईट स्टेशन ठरले आहे.

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, निरोगी आहाराची उपलब्धता, तयारीच्या वेळी अन्न हाताळणी, हस्तांतरण, अन्न कचरा व्यवस्थापन, स्थानिक व हंगामी खाद्य पदोन्नती आणि खाद्य सुरक्षेबाबत जनजागरूती या आधारे सीएसएमटी स्टेशनचा निवड करण्यात आली आहेत. 

मोठी बातमी - 'तो' म्हणाला हे काय किती पिंपल्स? तुझ्यापेक्षा तर मेहुणी सुंदर, एवढ्यावरूनच तिनं...

मध्य रेल्वेचे पाहिलवाहिलं रेल्वे स्थानक 

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन येथे प्रमाणित जेवण, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, निरोगी आहाराची उपलब्धता, तयारीच्या वेळी अन्न हाताळणी, हस्तांतरण व किरकोळ /सर्व्हिंग पॉईंट, अन्न कचरा व्यवस्थापन, स्थानिक व हंगामी खाद्य पदोन्नती आणि अन्न सुरक्षा व आरोग्यविषयक जागरूकता याआधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. आहार अंतिम लेखापरीक्षणानंतर एफएसएसएआयने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला 88 टक्के व्याप्तीसह पंचतारांकित रेटिंग प्रदान केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मध्य रेल्वेचे पहिले स्टेशन आहे ज्यास हे प्रमाणपत्र दिले गेले आहे.  

chatrapati shivaji maharaj railway station gets five star rating

loading image