esakal | अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?

अशोक चव्हाण यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याची बातमी मध्यंतरी  समोर आणली होती. 

अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची विधानसभा निवडणूकीवेळी कामगिरी खास नव्हती आणि त्यामुळे कॉंग्रेसला हवा तसा विजय मिळवता आला नाही, त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढून मला ते पद द्यावे. अशा मागणीचे पत्र सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिल्याची बातमी मध्यंतरी एका वृत्तवाहिनेने समोर आणली होती.

हेही वाचा - डबेवाल्यांना तातडीने घरे देण्याचे अजित पवारांचे आदेश

दरम्यान ही माहिती साफ खोटी असून मी असे कोणतेही पत्र लिहिले नसल्याचे चव्हाणांनी आपल्या अधिकृत ट्विटर वर एक ट्‌विट करत स्पष्ट केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळवून देखील स्वतःचे सरकार स्थापन करता आले नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसने मात्र मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र सध्या दररोज नवनवीन बातम्या समोर येतात. ज्यात महाविकास आघाडीत फूट पडत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान खुद्द कॉंग्रेसमध्ये देखील फूट पडत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी सर्वत्र व्हायरल होत होती.

महत्त्वाची बातमी - चाणक्य कोण? यावर अमित शाह स्वतः म्हणतात...

सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबांवर टिका करणारे पत्र थेट सोनिया गांधीना लिहिल्याचे या बातमीत सांगण्यात येत होते. तसेच थोरांताना पदावरुन हटवून मला ते पद द्यावे, अशी मागणीही चव्हाणांनी केली असल्याचे म्हटले जात होते. मात्र हे संपूर्ण वृत्त साफ खोटे असल्याचे स्वतः अशोक चव्हाण यांनी सांगितले असून त्या बद्‌द्‌लचे ट्विट ही त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन केले आहे. 

web title : Chavan demands for remove thorat from his post viral news