भाईंदरमध्ये फेसबूकवरील मैत्री पडली महागात, अत्याचार करुन लुटले सहा तोळ्याचे दागिने

अनिश पाटील
Thursday, 3 December 2020

आरोपीने तरुणीकडून सहा तोळे सोन्याचे दागिने घेतले आहेत. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तरूणीने याप्रकरणी गोराई पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईः  भाईंदर येथील तरुणीची फेसबुकवरून एका तरूणाशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्येही प्रेम झाले. आरोपीने त्यानंतर तरूणीवर अत्याचार करून त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्याकडे खंडणीची मागणी करण्यास सुरूवात केली. आतापर्यंत आरोपीने तरुणीकडून सहा तोळे सोन्याचे दागिने घेतले आहेत. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तरूणीने याप्रकरणी गोराई पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार 31 वर्षीय तरुणी भाईंदर येथील रहिवासी आहे. फेसबुकवर सक्रिय असलेल्या या तरुणीची फेसबुकमार्फत एका 31 वर्षीय तरुणाशी ओळख झाली. दोघांमध्येही फेसबुकवरून बोलणे सुरू झाल्यानंतर एकमेकांचे मोबाईल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. काही दिवस फोनवर बोलणे झाल्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या. दोघांमध्ये प्रेम झाले. त्यानंतर आरोपीने एकदा शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ तयार करून तरुणाने तिला धमकवण्यास सुरूवात केली.

अधिक वाचा-  अस्मितेच्या गप्पा नकोत फिल्मसिटीला चांगल्या सोयी द्या, आशिष शेलारांचा टोला

मागणी पूर्ण केली नाही, तर संबंधीत व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तो वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी करू लागला. तरुणीने आरोपी तरुणाला आतापर्यंत सहा तोळे सोने (तीन लाख किंमतीचे) त्याला दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

अधिक वाचा-  सरकारचा चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा थेट आरोप

अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून तरुणीनं याप्रकरणी गोराई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 376(बलात्कार), 328(गुंगीकारण औषध पाजणे), 384(खंडणी), 506(धमकावणे) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव नागरकर यांच्याशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही अधिक तपास करत असल्याचे सांगितले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Cheated by friend on Facebook in Bhayander The atrocities committed Girl


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheated by friend on Facebook in Bhayander The atrocities committed Girl