esakal | ऑनलाईन दारू मागवताय... एकाची अशी झाली 50 हजारांची फसवणूक... वाचा बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

फाईल फोटो

ऑनलाईन घरपोच दारू महागात

ऑनलाईन दारू मागवताय... एकाची अशी झाली 50 हजारांची फसवणूक... वाचा बातमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : तुम्ही ऑनलाईन दारु मागविण्याच्या विचारात असाल तर सावधान.... कारण अज्ञात टोळीकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. ही टोळी घरपोच दारु पाठवित असल्याचे प्रलोभन दाखवून ऑनलाईन फसवणूक करत आहे. या टोळीने अशाच पद्धतीने सीवूड्स सेक्टर-42 ए मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला घरपोच दारु पाठविण्याचे प्रलोभन दाखवून त्याच्याकडून 42 हजार 568 रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

सीवूड्स सेक्टर-42 मधील सचिन दिवे यांनी घरपोच दारुबाबतची जाहिरात करणाऱ्या श्याम लिकरचा नंबर गुगलवरुन मिळविला होता. त्यानंतर सचिनने 5 हजार 300 रुपयांच्या दारुची ऑर्डर दिल्यानंतर समोरील व्यक्तीने पेटीएमद्वारे सदर रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून सचिनला क्युआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडले.

आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

तसेच त्याला वेगवेगळी कारणे सांगून त्याच्या बँक खात्यातून 42 हजार 568 रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वळती करुन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

cheated Rs 50,000 in Seawoods under the pretext of alcohol

loading image
go to top