प्रसिद्ध ज्वेलर्स त्रिभुवन दास भिमजी झव्हेरीवर ६.५७ कोटी थकवल्याचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jewellers

प्रसिद्ध ज्वेलर्स त्रिभुवन दास भिमजी झव्हेरीवर ६.५७ कोटी थकवल्याचा आरोप

मुंबई: मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध ज्वेलर्स त्रिभुवन दास भिमजी झव्हेरी अँन्ड सन्स (Tribhovandas Bhimji Zaveri & sons) रिटेल प्रा. लि कंपनीच्या डायरेक्टरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुलुंडमधील (Mulund) भावी ज्वेलर्सचे (bhavi jewellers) हर्ष सुसानिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्रिभुवन दास भिमजी झव्हेरी अँन्ड सन्स रिटेल प्रा. लि कंपनीच्या डायरेक्टर हेमंत वज्रलाल झव्हेरी आणि गिरीश नायक यांच्याविरोधात हा फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा: पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE

मुलुंडच्या भावी ज्वेलर्स मधून सोन्याचे दागिने बनवून घेत, त्यांच्या कामाचे ६.५७ कोटी रुपये न दिल्याचा आरोप हा त्रिभुवन दास भिमजी झव्हेरी अँन्ड सन्स रिटेल प्रा. लि कंपनीच्या डायरेक्टर हेमंत झव्हेरी आणि गिरीश नायक यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Cheating Complaint Against Famous Jewellers Tribhovandas Bhimji Zaveri Sons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..