पोलिस महिलेचा 21 सहकाऱ्यांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

ठाणे - ठाणे ग्रामीण पोलिस सेवेत पोलिस नाईक पदावर असलेल्या माया बोंबे हिने तिच्या 21 सहकाऱ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.

ठाणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात माया बोंबे ही पोलिस नाईक पदावर आहे. ती 2015 पासून "सिट्रसइन' या गुंतवणूक कंपनीत एजंट म्हणून काम करत होती. प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये गुंतवल्यास तीन वर्षांत 45 हजार रुपये मिळतील, असे प्रलोभन माया बोंबे हिने सहकाऱ्यांना दाखवले.

यामध्ये 21 पोलिस कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली. क्‍लर्कचे काम करणाऱ्या बबिता शेलटकर हिने चार महिने भरलेले पैसे परत मागितले, तेव्हा माया हिने कंपनी बंद पडल्याचे सांगितले. त्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

Web Title: cheating by police women crime